काबूत ठेवा दमा सर्दीच्या दिवसात दंम्याच्या रुंगाचा त्रास काही वेळा बळावतो. श्वसनसंस्थेच्या विकारांवर अनेक गुणकारी औषधे होमिओपॅथीत उपलब्ध आहेत . दरम्यान विकारावर गुणकारी औषधे अशी १) अर्सेनिक ओलब: - दार वर्षी ठराविक ऋतूत उद्भवणाऱ्या तक्रारींवर हे औषध गुणकारी ठरते . दमा ,निमोनिया आदींवर उपयुक्त पुढील लक्षणांत या औषधाचा वापर करावा श्वासनलिका आकुंचन पाऊण रुग्णाला श्वसनाला त्रास होतो . आडवे पडल्यावर त्रास वाढतो . घुस्मटल्याची भावना होते मध्यरात्रीनंतर खोकला वाढतो छातीतून आवाज येतो रुग्ण मानसिक व शारीरिकदृष्ट्या अतिशय अस्वस्थ असतो थोड्याश्या श्रमाने खूप थकवा येणे आजाराची विशेषतः एकटे असण्याची ,मृत्यूची खूप भीती वाटणे २) नॅट्रम सल्फ :- दमा ,श्वास घ्यायला त्रास होणे ,छातीतून कफाचा आवाज येणे . विशेषतः पहाटे ४-५ वाजण्याच्या दरम्यान त्रास होणे खोकल्यातून चिकट तारेसारखे हिरवे कफ बाहेर पडते . लहान मुलांमधील दम्यावर उपयुक्त दर वेळेला सर्दीचे रूपांतर दम्याच्या विकारात होते .विशेषतः दमात हवा...