Skip to main content

Posts

Showing posts from April, 2022

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवायचंय? 'हे' उपाय ठरतील फायदेशीर*

 *कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवायचंय? 'हे' उपाय ठरतील फायदेशीर* 👉कोलेस्ट्रॉलचं वाढलेलं प्रमाण विविध आजारांना नियंत्रण देतं. शरीरातलं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढल्यास उच्च रक्तदाब, हृदयरोगाचा झटका येण्याची शक्यता वाढते.  👉कोलेस्ट्रॉलचं नियंत्रणात ठेवण्यासाठी अंड्यातला पिवळा भाग (बलक) खाणं टाळा. अंड्याच्या सफेद भागात प्रोटिन असतं. ते शरीरासाठी फायदेशीर असतं. शक्यतो देशी अंडीच खा. 👉अनेकांना जंक फूड आवडतं. मात्र यामुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं. त्यामुळे बाहेरचं खाणं टाळून घरी बनवलैलं ताजं ताजं खा. 👉कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी भाज्यांमध्ये कमी तेल वापरा. स्वयंपाकासाठी रिफाईन्ड तेल वापरु नका, लाकडी घाण्याचे शुद्ध तेल वापरा. 👉उकडलेल्या भाजा खाल्ल्यास ते जास्त उत्तम. त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहील. 👉 A2 प्रकारचे देशी गायीचे दूध  वापरा. बाजारातून पिशवीचे दूध आणायचे झाल्यास लो फॅट असलेलं दूध आणा. क्रीम दूध आणि प्रक्रिया केलेली डेअरी उत्पादनं टाळा.  👉कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करा.