आजची माहिती
अणुकचरा म्हणजे काय ?
अणुभट्टीत इंधन म्हणून युरनियमचा वापर केला जातो. जेव्हा युरेनियमच्या अणूचे विभाजन होते तेव्हा दोन मध्यम भाराच्या मूलतत्त्वांचा उत्पादन होते. बहुतांशी ही मूलतत्त्वे बेरियम व क्रिप्टॉन ही असतात. पण इतरही मुलतत्वांचे उत्पादन होऊ शकते. ही सारी किरणोत्सर्गी असतात व लक्षावधी वर्षे ती तशीच राहू शकतात. त्यांचा इतर काहीही उपयोग नसल्यामुळे त्यांना अणूकचराच मानले जाते परंतु त्यांचे प्रमाण फार नसते. परंतु या अणुविभाजनाच्या अभिक्रियेत इतरही किरणोत्सारी पदार्थांचे उत्पादन होत असते.
निसर्गात जे युरेनियम मिळते त्यात युरेनियमची २३५ व २३८ या दोन अणुभाराची समस्थानके असतात. यापैकी फक्त २३५ अणुभाराच्या युरेनियमच्या अणूंचेच विभाजन होऊ शकते; पण त्यांचे प्रमाण केवळ ७ दशांश टक्के असते. म्हणजे एक किलोग्रॅम युरेनियममध्ये सातशे ग्रॅम असते. उरलेल्या ९९.३ टक्के युरेनियमचे विभाजन होऊ शकत नाही; परंतु या युरेनियमकरवी अतिरिक्त न्यूट्रॉनचे शोषण होत असते. त्यापायी त्याचे किरणोत्सारी प्लुटोनियममध्ये रूपांतर होऊ शकते. म्हणजेच उपयोगी अशा संपूर्ण युरेनियमचे विभाजन झाल्यावर उरलेल्या जळीत इंधनामध्ये मोठय़ा प्रमाणावर किरणोत्सारी पदार्थांचा समावेश असतो. या सर्वाला मिळून 'अणुकचरा' असे म्हटले जाते.
वास्तविक ते नाव तसे समर्पक नाही, कारण कचरा संपूर्णपणे टाकाऊ असतो. अणुकचऱ्याच्या बाबतीत हे अंशत:च खरे आहे. कारण या जळीत इंधनावर रासायनिक पुनर्प्रक्रिया करून त्यातून अनेक उपयोगी घटक वेगळे करता येतात. पहिला घटक म्हणजे न जळालेले युरेनियम. यांचे प्रमाण तर सर्वात जास्त असते. किरणोत्सारी प्लुटोनियमचाही इंधन म्हणून वापर करता येतो. अणुभट्टी तसेच अण्वस्त्र दोन्हींसाठी त्याचा वापर होऊ शकतो. तेही या जळीत इंधनापासून वेगळे करता येते. त्याशिवाय इतर काही किरणोत्सारी समस्थानिकांचा वापर वैद्यकीय सेवा, शेती तसेच उद्योगधंद्यांमध्ये करता येतो. उदाहरणार्थ कोबाल्ट ६०चा वापर कर्करोगावर उपचार करण्यासाठी केला जातो. तसेच धातुंमधील जोडकाम व्यवस्थित झाले आहे की नाही याचे परीक्षण करण्यासाठीही केला जातो.
हे सारे उपयु पदार्थ त्या जळीत इंधनामधून वेगळे केल्यावर जे काही उच्छिष्ठ उरतं त्याला खऱ्या अर्थाने अणुकचरा असेही म्हणता येईल. त्याचे प्रमाण फारसे नसते.
याची विल्हेवाट लावण्याचे तंत्रज्ञानही विकसित झालेले आहे. घनकचरा वितळवुन त्याचे काचेच्या गोळीत रूपांतर करून तो जमिनीखाली सिमेंट काँक्रिटच्या जाड जाड भिंती असलेल्या विहिरींमध्ये गाडला जातो. द्रवरुप कचरा पातळ करून तो नि:सारित केला जातो. आपल्या देशानेही हे तंत्रज्ञान स्वबळावर विकसित करून आत्मसात केलेले आहे.
⭕साभार
डाॅ. बाळ फोंडके यांच्या 'काय ?' या पुस्तकातून

Comments
Post a Comment