केळीच्या सालीचे फायदे -
१) केळाच्या सालीचा आतील भाग चेहरा व मानेवर रगडा व अर्ध्या तासाने कोमट पाण्याने धुवा. असे नियमित केल्याने त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात.
२) पिकलेल्या केळाची साल दातांना लावली तर दातांचा पिवळेपणा जाऊन दात मोत्यासारखे चमकतात.
३) केळाची साल हळूवार चेहऱ्यावर चोळल्यास चेहऱ्यावरील मुरूमे, पुटकूळ्या नाहीशा होण्यास मदत
होते. केळाच्या सालीत अँटि-आँक्सिडंटस् असल्याने त्वचेवरचे पिगमेंटेशन, वांग, डाग, दूर होतात.
४) केळाच्या सालीतले सफेद धागे काढून त्यात ॲलोव्हेरा जेल मिसळून डोळ्याखाली लावल्यास डोळ्याखालील काळी वर्तुळे नाहीशी होतात.
५) एखाद्या मधमाशीने डंख, दंश, केला तर त्याठिकाणी केळाची साल बारीक करून लावल्यास आराम पडतो.
६) शरिरात एखाद्या ठिकाणी वेदना होत असेल तर. त्याठिकाणी ३० मिनिटांपर्यंत केळाची साल लावावी, आराम पडतो.
७) त्वचेवर कोठेही मोस किंवा चामखिळ असल्यास केळाची साल तिथे चोळावी. काही दिवसातच मोस, किंवा चामखिळ निघून जाते.
८) प्रदूषणामुळे किंवा संगणकावर जास्त वेळ काम केल्याने डोळ्यांवर ताण येतो. अशावेळी केळाची साल डोळ्यांवर ठेवावी, थंडावा मिळतो व त्यात असलेले विटामिनरल्स डोळ्यांना मिळतात व डोळे रिलँक्स होतात.
९). एका संशोधनातून असे सिद्ध झाले कि, केळाच्या सालीचा ताण-तणावनाशक (antidepressant) म्हणून वापर करता येतो. तुम्ही केळाची साल पाण्यात उकळवून ते पाणी प्यायलात तर त्याचा प्रभाव एखाद्या ताण-तणाव नाशकाप्रमाणे (antidepressant) असतो.
Comments
Post a Comment