सांधे आणि हाडांच्या आरोग्यासाठी हे कराच
- सर्व सांध्याचा नियमित व्यायाम दररोज साधारणतः 5 ते 10 मिनिटे
- वाचायची TV बघण्याची किंवा संगणकावर कामं करताना बसण्याची पद्धत आदर्श स्थितीच्या जवळ जाणारी हवी ,दार तास दीड तासाला उठून चक्कर मारून या .
- मानसिक तणाव असेल तर त्यावर सहकाऱ्यांची ,कुटुंबातील व्यक्तींची आणि गरज असल्यास मानसोपचार तज्ज्ञाची मदत घेऊन मात करा
- उतकृष्ट दिसणाऱ्या वस्तू खाण्याऐवजी सकस सात्विक आहार जो तुम्हाला आवडेल तो घ्या .पालेभाज्या , सलाड , फळे खा .
- 60 वर्षानंतर स्त्री पुरुष दोघांनीही आपल्या हाडांवरील शक्ती किती आहे हे बघण्यासाठी BMD (बोन मिनरल डेन्सिटी) चाचणी अवश्य घ्या
- सुट्टीच्या दिवशी आईस्क्रीम पिझ्झा भेळ खाण्यास हरकत नाही पण 30 ते 40 मिनिटे चालत जाऊन ते पदार्थ खा चालणे महत्वाचे
- 45 वर्षावरील स्त्रियांनी रोज अन्नात कॅल्शिअम युक्त व व्हिटॅमिनयुक्त पदार्थ खावेत .रोज कॅल्शिअमची एक गोळी घेणे सुद्धा चांगलेच
- शतपावली रोज घ्या सहस्त्र पावली तर फारच छान
- सहा महिन्यातून एकदा 3 ते 4 दिवस सहलीला जा

Comments
Post a Comment