Skip to main content

चुटपुट कामाच्या गोष्टी

चुटपुट
... डॉ.श्रीकांत तारे.

माझी आई सतत काहीतरी वाचत असायची. सुदैवाने तिच्या प्रयाणापर्यंत म्हणजे तिच्या पंचाहत्तरीतही तिची नजर शाबूत होती. 

कुठलंही पुस्तक, वर्तमानपत्राची पुरवणी, कचर्‍यात पडलेला एखादा चिठोरा किंवा कुठल्याही एखाद्या   कागदावर काही काळं उमटलं असू दे, आई ते वाचायला घ्यायची. वाचनाचं वेडच होतं तिला. 

रविवारी विविध वर्तमानपत्रांच्या पुरवण्या आमच्याकडे येत असत. हा दिवस तिच्यासाठी पर्वणी असे. घरकाम करता करता ती मधूनच काहीतरी वाचून घ्यायची. अगदी गॅसवर उकळणारी आमटी ढवळताना सुद्धा पुलंचं एखादं पुस्तक वाचताना मी तिला बरेचदा बघितलं आहे. विनोदी काही वाचून ती खदखदून हसायची. डोळ्यात पाणी येईपर्यंत हसायची. गंभीर काहीसं वाचलं की गंभीर व्हायची. मनांत खोलवर काही जाणवलं की तिच्या डोळ्यात ढग दाटायचे. रणजीत देसाईंचं ‘स्वामी’ वाचताना, पुलंचं ‘फसवणूक’ चाळताना किंवा मल्लिका अमरशेखांचं ‘मला उध्वस्त व्हायचंय’, पचवताना आईला आम्ही वेगवेगळ्या भावनांच्या सरीत चिंब भिजताना कितीतरी वेळा बघितलंय. काही वाचताना त्या लेखनाशी एकरूप होणं तिला कसं काय जमायचं देव जाणे, पण त्या लेखनात शिरून त्यातल्या प्रसंगाचा भाग होऊन जाणं हा तिचा नैसर्गिक गुण होता. छापील सगळंच तिला आवडायचं असंही नाही. एखादं लेखन आवडलं नाही तर नकारार्थी मान हलवून, डोळे बारीक करीत हात हलवून ‘काही दम नाही बुवा’ अशा अर्थाची खूण ती करायची.तिला आवडलेला एखादा उतारा ती मला दादांना वाचून दाखवायची...
            

माझ्या लग्नापर्यंत म्हणजे स्वयंपाक घरात तिचं एकछत्र राज्य असेपर्यंत आईचं स्वयंपाक पाणी आटपलं  की ती ती पलंगावर वाचायला बसायची. दोन्ही पाय दुमडून, एक हात गालावर आणि दुसरा पुस्तकाच्या पानावर असं आई बसली की तिच्या एकाग्रतेत बाधा येईल असं काही करायचं नाही हे आम्हा भावंडांना ठाऊक होतं. माझ्या लग्नानंतर तीचा स्वयंपाक घरातीळ वावर कमी होत गेला पण घरच्या जबाबदारीतून हे असं हलकेच निवृत्त होणं तिनं साजरं केलं जणू, तिचं वाचनवेड अधिकच वाढलं...

कालामानानुसार आमच्या कुटुंबाची आर्थिक ओढाताण जरा कमी झाली तेव्हा आईनं हट्टानं दादांना पुस्तकं विकत घ्यायला सुरुवात करायला लावली आणि बघता बघता तिच्या खोलीत तीन-साडेतीनशे पुस्तकाचा तिचा वैयक्तिक पुस्तक संग्रह तयार झाला. तिच्या भोवतालचा हा पुस्तक खजिना लहानपणापासून मीही उत्सुकतेने बघत असल्यामुळे मला वाचनाची आवड निर्माण साहजिकच होतं. माझ्या सुरुवातीच्या काळातील अत्याधिक वाचनामुळे मला लिहावसं वाटलं असावं. मग मी काहीतरी लिहायचा प्रयत्न करायचा, चोखंदळ वाचक म्हणून आईला वाचायला द्यायचा. मुलाने लिहिलं म्हटल्यावर तीही हौसेने माझं लेखन वाचायची, कौतुक करायची, प्रसंगी सुधारणा सुचवायची. तिच्यावरील श्रद्धेमुळे तिच्या सूचना मीही तंतोतंत पाळायचा.

आईची खोली आमच्या घराच्या पश्चिमेकडे होती. आई तिथल्या खिडकीशी वाचत बसायची, पुरेसा प्रकाश पुस्तकावर घेत वाचन एंजॉय करायची. अंधार होऊ लागला आणि वाचन अगदीच अशक्य झालं की ती अनिच्छेनं उठायची आणि थोडा बाहेर फिरून येऊन, देवासमोर दिवा लावून आपल्या खोलीत येऊन पुन्हा वाचत बसायची. का कोण जाणे पण आईला दिव्याकडे तोंड करून वाचायला बसायची संवय होती. यामुळे पुस्तकावर उजेड तर यायचा पण तिच्या डोळ्यावरही दिव्याचा प्रकाश पडायचा. थोड्यावेळाने डोळ्यावरचा हा प्रकाश त्रासदायक वाटू लागला की ती  दिव्याकडे पाठ करायची, पण यामुळे पुस्तकावर तिची सावली पडायची आणि पुस्तकावर अंधार यायचा. अर्थात ती वाचनात इतकी गढून गेलेली असे की अंधार प्रकाशाचा हा खेळ तिला फारसा जाणवत नसावा. उत्तरार्धात, वार्धक्याने थकलेल्या आईला रात्री साडे दहाच्या सुमारास झोप अनावर व्हायची. वाचत असलेलं पान कसंतरी पूर्ण करून त्यावर कागदाचा तुकडा खूण म्हणून ठेवीत दिवा बंद करायला धडपडत उठायची. दिव्याचं बटन सहा फूट अंतरावर असल्याने तिला उठून जायचा खुप कंटाळा येत असणार. पण अश्याही अवस्थेत, वाचनाच्या हौसेची किंमत कुठल्या न कुठल्या रुपाने द्यावी लागते हेही ती जाणून होती. पुढेपुढे ती मला दिवा बंद करायला आवाज देऊ लागली मग मी कटकट करत माझ्या खोलीतून यायचा, तिच्या वाचनाच्या वेडाकरता काहीतरी नकारात्मक बोलायचा, कधी झोपेचं सोंग घेऊन जणू मला ऐकूच आलं नाही असं भासवायचा. दिवा मालवायला उठावं लागणं नेहमीचंचं झालं म्हटल्यावर   मला ही कंटाळा येणं अपरिहार्य होतं. दोन-चार वेळा आवाज देऊनही माझी काहीच प्रतिक्रिया नाही म्हटल्यावर ती तसंच दिवा उघडा ठेवून झोपायचा प्रयत्न करायची. एका रात्री दोन वाजता मी पाणी प्यायला उठलो असतां तिच्या खोलीतला दिवा मला लागलेला दिसला. मी आत डोकावलो तर आई चक्क जागी होती. जागरणाचं कारण विचारलं तर ‘दिवा लागला असल्याने झोप येत नाही’ म्हणली, मला खूपच अपराध्यासारखं वाटलं. तिच्या खोलीतला दिवा मालवून मी पुन्हा झोपायला गेलो. आईच्या निर्वाणाच्या दोन दिवसापूर्वीपर्यंत तिच्या खोलीतला दिवा बंद करायला उठावं लागल्याचं मला स्मरतंय...

आठवडाभराच्या आजारानं आई गेली आणि तिची खोली अगदी एकटी पडली. मी, ही, मुलं आणि दिवसातून एखादा येणारा जाणारा दिवसातून एकदा केव्हातरी त्या खोलीत जायचे, दोन घटका बसायचे तिच्या आवडी निवडी बद्दल चर्चा करायचे. अर्थात तिची आवड म्हटलं की तिच्या पुस्तकांचा, वाचनाचा विषय अपरिहार्यपणे बोलला जायचा. आम्ही मग तिथल्या पुस्तकांची एखादी चळत काढायचो, उगागाच चाळायचो. आईनं स्पर्शलेल्या पुस्तकाला हात लावताना, ती अजून इथेच आहे हे सहजच जाणवायचं. तिचा तेरावा आटपेपर्यंत आम्ही जवळजवळ रोजच त्या अलीबाबाच्या गुहेची सफर करीत होतो.
पुढे ती खोली नकळत माझी झाली. एका सायंकाळी मी सहजच तिच्या पलंगावर बसून काहीतरी वाचत होतो.   दरम्यान तिच्या डोळ्यावर दिव्याचा यायचा तसाच उजेड माझ्या डोळ्यावर आला म्हणून मी जागा बदलली, बाहेर हॉलमध्ये येऊन वाचायला बसलो. आणि काय डोक्यात आलं, की दुसऱ्या दिवशी मी त्या खोलीत हवेहवेसे बदल करून घेण्यासाठी इलेक्ट्रिशियन बोलावला. दिव्याची जागा बदलून, वाचताना पुस्तकावर प्रकाशझोत पडेल अशी करून घेतली, त्या दिव्याचं बटन पलंगावर पडल्यापडल्याच बंद करता येईल अश्या ठिकाणी करून घेतलं. फक्त तीनशे रुपये खर्च करून पलंगावर मस्त लोळत मी वाचनाचा आस्वाद घेतला, आपल्या जागेवरून अजिबात न हलता नुसतं हात लांब करून दिवा बंद केला. खूप आनंदाने मी हिला हाक मारली, हिनेही त्या सर्व सोयी अपूर्वाईनं बघितल्या,  तोंडाव्हीआर हात ठेऊन ‘अगंबाई, खरंच की!’ असे आश्चर्योद्गार काढले. आपण खूपसं काहीतरी वेगळं केलंय या जाणिवेनं मी मोहरलो...
           
आणि......... आणि  अचानक माझ्या पोटात प्रचंड खड्डा पडला. दिव्याची ही व्यवस्था मला आई असताना का नाही  सुचली? वाचनासारख्या एका ईश्वर प्रदत्त वेडापायी तिचे हाल होताना मी नुसतंच पाहत राहिलो? खरंतर माझ्यासाठी हे सगळं करून घेणं किती सोपं होतं, पैशाचाही प्रश्न नव्हता. फक्त मनातून काहीतरी वाटण्याची गरज होती.  पलंगावर पडल्या पडल्या तिला दिवा बंद करता आला असता तर तिच्या शेवटच्या दिवसात तिचे कष्ट तर वाचले असतेच पण आपल्या मुलाने आपली सोय पाहिली याचं कितीतरी मोठं समाधान तिच्या चेहर्‍यावर मला बघायला मिळालं असतं. मला आतल्या आत खूप रडू आलं. इतकी वर्षे वाचन करून आपण त्यातलं काहीच घेतले नाही याची प्रथमचं जाणीव झाली, नव्हे आपल्या बुद्धीची माती झाली असं वाटायला लागलं.  म्हातारी आई जाणं नैसर्गिक होतं, पण तिची सहज सोय करण्याचं न सुचणं हा गुन्हा होता, नव्हे ते पाप होतं. *नंतर फक्त पश्चाताप करावा लागतो म्हणजे नेमकं काय हे त्याक्षणी जाणवलं... 

आता कितीही पश्चाताप केला, अगदी प्राण जरी दिला तरीही तिचे ते दिवस परत नाही आणू शकत मी.
न संपणारी चुटपुट लागून राहिलीय मनाला ....
                                                                 कायमची...!!!


डॉ. श्रीकांत तारे

Comments

Popular posts from this blog

Top Business Ideas which make you rich fastest

Top Business Ideas which make you rich fastest   be a richest within time  Invest in index funds for long-term growth. Investing in index funds allows you to diversify your portfolio and gain exposure to a broad      market index, aiming for long-term growth by tracking the performance of the overall market. Build and monetize a successful YouTube channel. Creating engaging video content on YouTube and building a substantial subscriber base can lead to monetization through ads, sponsorships, and partnerships, providing a potential income stream. Develop and sell software or mobile apps. Designing and developing software applications or mobile apps can be lucrative if you create a product that fulfills a need in the market and successfully market and sell it. Invest in rental properties for passive income. Investing in real estate properties and renting them out can provide a steady stream of passive income through rental payments, along with potential property ...

केळीच्या सालीचे फायदे -

 केळीच्या सालीचे फायदे -   १) केळाच्या सालीचा आतील भाग चेहरा व मानेवर रगडा व अर्ध्या तासाने कोमट पाण्याने धुवा. असे नियमित केल्याने त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात. २)  पिकलेल्या केळाची साल दातांना लावली तर दातांचा पिवळेपणा जाऊन दात मोत्यासारखे चमकतात. ३)  केळाची साल हळूवार चेहऱ्यावर चोळल्यास चेहऱ्यावरील मुरूमे, पुटकूळ्या नाहीशा होण्यास मदत   होते. केळाच्या सालीत अँटि-आँक्सिडंटस् असल्याने त्वचेवरचे पिगमेंटेशन, वांग, डाग, दूर होतात. ४)  केळाच्या सालीतले सफेद धागे काढून त्यात ॲलोव्हेरा जेल मिसळून डोळ्याखाली लावल्यास डोळ्याखालील काळी वर्तुळे नाहीशी होतात. ५)  एखाद्या मधमाशीने डंख, दंश, केला तर त्याठिकाणी केळाची साल बारीक करून लावल्यास आराम पडतो. ६) शरिरात एखाद्या ठिकाणी वेदना होत असेल तर. त्याठिकाणी ३० मिनिटांपर्यंत केळाची साल लावावी, आराम पडतो. ७) त्वचेवर कोठेही मोस किंवा चामखिळ असल्यास केळाची साल तिथे चोळावी. काही दिवसातच मोस, किंवा चामखिळ निघून जाते. ८) प्रदूषणामुळे किंवा संगणकावर जास्त वेळ काम केल्याने डोळ्यांवर ताण येतो. अशावेळी केळाची साल डोळ्यां...

शेवग्याची भाजी सेवन कराल तर 300 रोग दूर होतील, जाणून घ्या शेवगा खाण्याचे फायदे*

 शेवग्याची भाजी सेवन कराल तर 300 रोग दूर होतील, जाणून घ्या शेवगा खाण्याचे फायदे* तुमच्या पैकी अनेकांना शेवग्याच्या शेंगेच्या भाजी बद्दल माहिती असेलच आणि तुम्ही ही भाजी आवडीने खात देखील असाल. हिरव्या रंगाची सामान्य इतर शेंगा पेक्षा लांब असते. याभाजी मध्ये अनेक औषधी गुण असतात, आयुर्वेद ग्रंथानुसार याच्या वापरामुळे 300 रोगांचा उपचार केला जाऊ शकतो, शेवगा ही भाजी खाण्यास स्वादिष्ट असलेल्या या भाजीचे काय फायदे आहेत चला पाहू. यामध्ये खालील पोषक तत्व विटामिन A, B1, B2, B3, B5, B6, B9, C पोटैशियम डाइटरी फाइबर वाटर कार्बोहाइड्रेट प्रोटीन सोडियम जिंक और फास्‍फोरस कैल्शियम आयरन हाडांसाठी फायदेशीर शेवग्यामध्ये कैल्शियम भरपूर असते ज्यामुळे हे हाडांच्यासाठी फायदेशीर असते. यामुळे बोन डेंसिटी कमी होते. जर तुमच्या पायामध्ये वेदना होतात, सांधेदुखी, लकवा, दमा, मुतखड्याचा त्रास असेल तर शेवग्याच्या मुळांमध्ये ओवा, हिंग आणि सुंठ मिक्स करून याचा काढा बनवा आणि सेवन करा यामुळे फायदा होईल. डायबेटीस मध्ये फायदेशीर जर तुम्हाला डायबेटीसचा त्रास असेल तर हे तुमच्यासाठी रामबाण औषधी ठरेल. शेवगा ब्लड शुगर लेवल कमी क...