आरोग्य म्हंजे काय ?
तुम्ही म्हणाल आजारी नासाने म्हणजे निरोगी असणे ! तुमची आरोग्याची संकल्पना चुकीची आहे, हे तुमच्या उत्तरावरूनच समजते .
आयुर्वेद हे एक वैद्यकीय शास्त्र आहे जेथे रोगाच्या आधी आरोग्याचा विचार केला जातो, रोग होऊच नये म्हणून काय करावे ते सांगितले जाते . निरोगी असणे शारीरिक तसेच मानसिक पातळीवर देखील महत्वाचे मानले जाते आयुर्वेद शास्त्र सांगते कि तुमचे शरीर व मन प्रसन्न असेल तरच तुम्ही healthy व सुखी आहत काही गोष्ट आहेत त्यावरून तुमचे शरीर व मन प्रसन्न आहे कि नाही हे तुमचे तुम्हीच ठरवू शकता .
- आरोग्याची लक्षणे कोणती?
- कडकडून भूक लागणे
- अण्णा व्यवस्थित पचणे
- म्हणजेच आंबट , करतात ढेकर न येणे ,गॅसचा त्रास ना होणे
- कोणतेही सारक चूर्ण ना घेता स्वचास जाणे
- मालविसर्जनानंतर पॉट हलके वाटणे रात्री गाढ झोप लागणे
- रात्री मध्येच जग न येणे
- जाग आल्यानंतर लोळावेसे न वाटणे
- मनामध्ये सतत सकारात्मक भावना असणे
नकारात्मक भावना नसणे म्हणजेच सकारात्मक भावना
सध्या आपल्या मनामध्ये नकारात्मक भावनाच जास्त येतात
उदा.सकाळी उठल्या बरोबर आज ऑफिस ला दांडीच मारावी , कशाला सकाळीच कॉलेज ठेवलाय ?
कामाचं नको असा वाटतंय ,आज मला नाही वाटत आपला अभ्यास पूर्ण होईल . या नकारात्मक भावना आपल्या मनात सतत येणे मानसिक अनारोग्याचेच लक्षण आहे .
वर जी लक्षणे दिली आहे त्यांपैकी किती लक्षणे तुम्हाला तुमच्या मध्ये सापडतात ?
आजच्या सध्याच्या धावपळीच्या स्पर्धेत आरोग्याची सगळी लक्षणे असणारी व्यक्ती मिळणे अतिशय दुर्मिळ आहे .
Comments
Post a Comment