| “Beauty is in the skin! " |
होळी झाली आणि उन्हाळा सुरू झाला. या काळात बदलत्या ऋतूंचा परिणाम आपल्या त्वचेवर दिसू लागतो.
उष्णतेमुळे त्वचेतील तैलग्रंथी अधिक उत्तेजित होतात. या तैलग्रंथीतून स्त्रवणाऱ्या विशेष स्त्रवामुळे (ज्याला 'सीबम' म्हणतात) त्वचा अधिक तेलकट व चिकट दिसू लागते. म्हणूनच उन्हाळ्यात त्वचेवरील मुरमांचे(pimples) प्रमाण वाढते.
उन्हाच्या तीव्रतेमुळे त्वचा पटकन काळवंडते (टॅन होते). उष्णतेमुळे त्वचेतील घामाच्या ग्रंथी अधिक कार्यरत होतात व घामाचे प्रमाण वाढते. या अधिक येणाऱ्या घामामुळेच शरीराचे तापमान संतुलित राहते; पण वाढत्या घामामुळे बरेच लोक (लहान व मोठे) घामोळ्यांच्या त्रासाने बेजार होतात. लहान मुलांमध्ये चेहऱ्यावर व मानेवर फोड व गाठींचे प्रमाण अधिक दिसून येते. त्वचेची निगा कशी राखाल?
त्वचेची निगा कशी राखल :
* त्वचा स्वच्छ राखणे फार आवश्यक आहे. त्याकरिता चेहरा दिवसातून ३-४ वेळा नॅचरल पीएच फेस वॉश नी धुवावा, खासकरून बाहेरून परतल्यावर लगेच.
दिवसातून आंघोळसुद्धा दोन करावी. आंघोळीसाठी अॅन्टीबॅक्टेरिअल सोपचा वापर करायला हरकत नाही
* फिटिंगचे सिंथेटिक मटेरियलचे कपडे टाळावेत. सैल, कॉटनच्या कपड्यांचा वापर करावा, जेणेकरून घामोळ्यांचे प्रमाण कमी होऊ शकते.
त्वचेचे आरोग्य व रंग राखून ठेवण्याकरिता नियमितपणे सनस्क्रीन क्रीम/ लोशनचा वापर करावा.
आहारात जीवनसत्त्व 'क' (व्हिटॅमिन सी) चा समावेश केल्याने घामोळ्यांचे प्रमाण कमी होण्यास मदत
होते होते विटामिन .सी असलेले पदार्थ
टोमॅटो हिरव्या पालेभाज्या, लिंबू, आंबा,
आवळे, मंत्री व मोसंबी
काही घरगुती टिप्स: त्वचेचे सौंदर्य ठेवण्याकरिता काही घरगुती उपाय.
१) टॅन पीलर : चार मोठे चमचे कलिंगडाचा गर, चार मोठे चमचे पिकलेल्या संत्र्याचा गर, एक मोठा चमचा चंदन पेस्ट हे मिश्रण चेहरा व मानेला लावावे व कोरडे झाल्यावर धुवावे. त्याने कांती उजळण्यास मदत होते..
२) डोक्यावर व चेहऱ्यावर येणाऱ्या पुळ्यांकरिता : दोन चमचे किसलेली काकडी, २ चमचे ताक व १ चमचा चंदन पेस्ट. हे मिश्रण त्वचेवर ५-१० मिनिटे लावून, मग धुवून काढावे.
३) सनबर्नकरिता : अ) दोन मोठे चमचे किसलेला बटाटा व दोन मोठे चमचे दही, हे मिश्रण दहा मिनिटांकरिता चेहऱ्याला लावा व नंतर ताकाने धुवून टाका.
ब) किसलेली काकडी ताकात मिसळून चेहऱ्याला लावून ठेवा. दिवसभरात ८-१० ग्लास पाणी प्यायला विसरू नका!!!
Comments
Post a Comment