Skip to main content

आपले पाय मजबूत ठेवा - नियमितपणे चालण्याचा व्यायाम करा -

 *आपले पाय मजबूत ठेवा - नियमितपणे चालण्याचा व्यायाम करा - अत्यंत वाचनीय लेख :*







▪️ *आपण वयाने वाढतो तेंव्हा आपले पाय नेहमी मजबूत असायला हवेत.*

▪️ *आपण जसे वृध्दत्त्वाकडे झुकत असतो* *किंवा वृध्द होतो तेंव्हा आपले केस पांढरे होणे किंवा त्वचा ढिली होणे, सुरकुतणे या नैसर्गिक गोष्टी असल्याने घाबरायचं कारण नाही.*

▪️ *प्रिव्हेन्शन या अमेरिकन नियतकालिकात* *लिहिल्याप्रमाणे आयुष्य लांबताना दिसणाऱ्या लक्षणांमध्ये पायाच्या भक्कम स्नायूंना सर्वात* *वरचे स्थान दिले आहे आणि ते महत्त्वाचे तथा आवश्यक आहे.*


▪️ *दोन आठवडे तुमच्या पायांना  हालचाल  नसेल तर तुमच्या पायांची मजबुती १० वर्षांने कमी झालेली असेल.*


▪️ *डेन्मार्कच्या कोपनहेगन विद्यापीठाने केलेल्या अभ्यासानुसार असं आढळलंय की, तरूण अथवा वृध्द दोघांमध्ये पायांच्या हालचाली दोन आठवडे थांबल्यास पायांच्या स्नायूंची शक्ती एक तृतीयांशाने कमी म्हणजेच २०/३० वर्षांनी वृध्द झाल्यासारखी होते.*


▪️ *एकदा  आपल्या पायांचे स्नायू दुबळे झाले तर बरे होण्यास खूप काळ लागतो.*  *नंतर कितीही पूर्वीसारखी हालचाल करण्याचा प्रयत्न अथवा व्यायाम केला तरी फारसा फरक पडत नाही.*


▪️ *म्हणून चालण्याचा नियमित व्यायाम करणे अतिशय महत्त्वाचे आहे.*


▪️ *आपल्या संपूर्ण शरीराचे वजन/भार पायांवर पडतो किंवा पायांना पेलावा लागतो.*


▪️ *आपल्या शरीराचा भार सोसणारे आपले पाय म्हणजे जणू खांबच आहेत.*


▪️ *गंमत म्हणजे शरीरातील ५०% हाडं आणि ५० % स्नायू आपल्या दोन पायांत असतात.*


▪️ *मनुष्याच्या शरीरातील सर्वात बळकट सांधे आणि हाडं हीसुध्दा पायांतच असतात.*


▪️ *मनुष्याच्या शरीराचा महत्त्वाचा भार वाहणारा असा एक त्रिकोण मजबूत हाडं, बळकट स्नायू आणि लवचिक सांधे यांच्यास्वरूपात तयार होतो.*


▪️ *मानवाच्या शरीराच्या ७०% हालचाली आणि आयुष्यातील शक्ती खर्ची पडते ती दोन पायांमुळेच.*


▪️ *तुम्हाला माहीत आहे का , की, तरूण माणसाच्या मांड्यांमध्ये एक छोटी मोटार कार उचलण्याइतकी शक्ती असते ?*


▪️ *पाय हे शरीराच्या चलनवलनाचा केंद्रबिंदु असतात.*


▪️ *दोन्ही पायात मिळून शरीरातील एकूण नसांपैकी ५०% नसा, ५०% रक्तवाहिन्या असतात आणि त्यांतून ५०% रक्त वाहात असतं.*


▪️ *अवघ्या शरीराला जोडणारे ते एक रक्ताभिसरणाचे मोठे जाळें आहे.*


▪️ *जेंव्हा पाय सशक्त असतात तेंव्हाच रक्तप्रवाह व्यवस्थित चालतो. म्हणून ज्यांच्या पायांचे स्नायू बळकट त्यांचे ह्रदयसुध्दा निश्चितच बळकट असते.*


▪️ *वार्धक्य पायांकडून सुरु होऊन पायांपासून वर सरकत असते.*


▪️ *जसजसे वार्धक्य वाढते तसतसे शरीरातील पायांकडून मेंदूकडे जाणाऱ्या संदेशाची अचूकता आणि त्यांचा वेग कमी होत जातात. तारुण्यात तसे नसते.*


▪️ *तसेच हाडांचे तारणहार समजले जाणारे शरीरातील कॅल्शियम काळाबरोबर कधीतरी नष्ट होते,  त्यामुळे म्हाताऱ्या व्यक्तींमध्ये अस्थिभंग लवकर होतो.*


▪️ *अस्थिभंग (Bone fractures) वयस्क लोकांमध्ये अनेक गुंतागुंतीच्या मालिकेला कारण ठरू शकतो, विशेषतः मेंदूतील रक्तस्रावासारखे जीवघेणे आजार.* 


▪️ *पायांचे व्यायाम केंव्हाही सुरू करता येतात, अगदी साठीनंतरसुध्दा.*


▪️ *आपले पाय काळाबरोबर वृध्द होत असले तरी पायांचे व्यायाम हे आयुष्यभरासाठीचे कार्य असावे.*


▪️ *केवळ पायांची बळकटी वाढवणेदेखील वृध्दत्व थोपवू शकते.* 


▪️ *रोज किमान ३०/४० मिनिटे चाला, जेणेकरून पायांना पुरेसा व्यायाम मिळून पायांचे स्नायू सशक्त राहतील.*


*आपल्या जवळच्या वयस्क मित्रांना आणि कुटुंबियांना ही माहिती अवश्य पाठवा.*



Comments

Popular posts from this blog

Top Business Ideas which make you rich fastest

Top Business Ideas which make you rich fastest   be a richest within time  Invest in index funds for long-term growth. Investing in index funds allows you to diversify your portfolio and gain exposure to a broad      market index, aiming for long-term growth by tracking the performance of the overall market. Build and monetize a successful YouTube channel. Creating engaging video content on YouTube and building a substantial subscriber base can lead to monetization through ads, sponsorships, and partnerships, providing a potential income stream. Develop and sell software or mobile apps. Designing and developing software applications or mobile apps can be lucrative if you create a product that fulfills a need in the market and successfully market and sell it. Invest in rental properties for passive income. Investing in real estate properties and renting them out can provide a steady stream of passive income through rental payments, along with potential property ...

केळीच्या सालीचे फायदे -

 केळीच्या सालीचे फायदे -   १) केळाच्या सालीचा आतील भाग चेहरा व मानेवर रगडा व अर्ध्या तासाने कोमट पाण्याने धुवा. असे नियमित केल्याने त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात. २)  पिकलेल्या केळाची साल दातांना लावली तर दातांचा पिवळेपणा जाऊन दात मोत्यासारखे चमकतात. ३)  केळाची साल हळूवार चेहऱ्यावर चोळल्यास चेहऱ्यावरील मुरूमे, पुटकूळ्या नाहीशा होण्यास मदत   होते. केळाच्या सालीत अँटि-आँक्सिडंटस् असल्याने त्वचेवरचे पिगमेंटेशन, वांग, डाग, दूर होतात. ४)  केळाच्या सालीतले सफेद धागे काढून त्यात ॲलोव्हेरा जेल मिसळून डोळ्याखाली लावल्यास डोळ्याखालील काळी वर्तुळे नाहीशी होतात. ५)  एखाद्या मधमाशीने डंख, दंश, केला तर त्याठिकाणी केळाची साल बारीक करून लावल्यास आराम पडतो. ६) शरिरात एखाद्या ठिकाणी वेदना होत असेल तर. त्याठिकाणी ३० मिनिटांपर्यंत केळाची साल लावावी, आराम पडतो. ७) त्वचेवर कोठेही मोस किंवा चामखिळ असल्यास केळाची साल तिथे चोळावी. काही दिवसातच मोस, किंवा चामखिळ निघून जाते. ८) प्रदूषणामुळे किंवा संगणकावर जास्त वेळ काम केल्याने डोळ्यांवर ताण येतो. अशावेळी केळाची साल डोळ्यां...

शेवग्याची भाजी सेवन कराल तर 300 रोग दूर होतील, जाणून घ्या शेवगा खाण्याचे फायदे*

 शेवग्याची भाजी सेवन कराल तर 300 रोग दूर होतील, जाणून घ्या शेवगा खाण्याचे फायदे* तुमच्या पैकी अनेकांना शेवग्याच्या शेंगेच्या भाजी बद्दल माहिती असेलच आणि तुम्ही ही भाजी आवडीने खात देखील असाल. हिरव्या रंगाची सामान्य इतर शेंगा पेक्षा लांब असते. याभाजी मध्ये अनेक औषधी गुण असतात, आयुर्वेद ग्रंथानुसार याच्या वापरामुळे 300 रोगांचा उपचार केला जाऊ शकतो, शेवगा ही भाजी खाण्यास स्वादिष्ट असलेल्या या भाजीचे काय फायदे आहेत चला पाहू. यामध्ये खालील पोषक तत्व विटामिन A, B1, B2, B3, B5, B6, B9, C पोटैशियम डाइटरी फाइबर वाटर कार्बोहाइड्रेट प्रोटीन सोडियम जिंक और फास्‍फोरस कैल्शियम आयरन हाडांसाठी फायदेशीर शेवग्यामध्ये कैल्शियम भरपूर असते ज्यामुळे हे हाडांच्यासाठी फायदेशीर असते. यामुळे बोन डेंसिटी कमी होते. जर तुमच्या पायामध्ये वेदना होतात, सांधेदुखी, लकवा, दमा, मुतखड्याचा त्रास असेल तर शेवग्याच्या मुळांमध्ये ओवा, हिंग आणि सुंठ मिक्स करून याचा काढा बनवा आणि सेवन करा यामुळे फायदा होईल. डायबेटीस मध्ये फायदेशीर जर तुम्हाला डायबेटीसचा त्रास असेल तर हे तुमच्यासाठी रामबाण औषधी ठरेल. शेवगा ब्लड शुगर लेवल कमी क...