*ही सहा लक्षणे दिसली तर असू*
*शकते व्हिटॅमिन सी ची कमतरता*
मानवी शरीराला विविध प्रकारच्या व्हिटॅमिन्सची आवश्यकता असते. यापैकी एखाद्या जरी व्हिटॅमिनच शरीरात कमतरता निर्माण झाली तर त्याचे परिणाम शरीरावर दिसून येतात. अशा महत्वाच्या व्हिटॅमिन्सपैकी व्हिटॅमिन सी हे सुद्धा एक अतिशय आवश्यक पोषकतत्व आहे. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. शरीराच्या प्रवाह तंत्राची क्रिया योग्य राहते. नवीन पेशींची निर्मिती होते. त्वचा हेल्दी राहते. या व्हिटॅमिनची कमतरता निर्माण झाल्यास कोणती लक्षणे दिसून येतात, ते जाणून घेवूयात.
*हे संकेत ओळखा*
*1. हृदयरोग*
व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे हृदयासंबंधी आजारांचा धोका वाढतो
*2. अंगदुखी*
सतत अंगदुखीची समस्या होत असेल तर आहाराकडे लक्ष देण्याची गरज आहे. कारण अंगदुखी आणि सांधेदुखी या समस्या बहुतांश शरीरात व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे होतात.
*3. त्वचा*
त्वचा रखरखीत, निर्जीव दिसत असल्यास व्हिटॅमिन ची कमतरता असू शकते. सतत पिंपल्स येणे हे देखील व्हिटॅमिन सी च्या कमतरतेचे लक्षण आहे.
*4.थकवा*
व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे सतत थकवा जाणवतो. मन कामात लागत नाही. हे शारीरिक आणि मानसिक क्रियेसाठी फार गरजेचे आहे.
*5. केसगळती, कमजोर नखे*
सतत केसगळती आणि नखे तुटणे ही समस्या व्हिॅटॅमिन सी च्या कमतरतेमुळे होते.
*6. हिरड्यांना सूज*
या व्हिटॅमिनची कमतरता निर्माण झाल्यास हिरड्यांना सूज येते. नाकातून रक्त येण्याची समस्या दुर्लक्ष केल्यास ही समस्या अधिक वाढू शकते.
*व्हिटॅमिन सी चे फायदे*
1. रोज वेगवेगळ्या पदार्थांमधून व्हिटॅमिन सी चं सेवन केल्यास तुमचे दात आणि हिरड्या निरोगी राहू शकतात.
2. नसा आणि पेशींच्या क्रियेला आधार मिळतो. तसेच व्हिटॅमिन सी मुळे रक्तही शुद्ध होतं आणि शरीरातून विषारी तत्व बाहेर काढण्यासही मदत मिळते.
3. व्हिटॅमिन सी आपल्या हाडांना मजबूती देतं. पण ते कमी झाल्यास याने आपले कार्टिलेज कमजोर होऊ लागतात आणि याने सतत अंगदुखीची समस्या होत राहते.
4. व्हिटॅमिन सीमुळे आपली त्वचा चांगली होते आणि वाढत्या वयाचे संकेत दिसत नाहीत. तसेच त्वचेवर सुरकुत्याही येत नाहीत

Comments
Post a Comment