*दिवसभर सक्रिय राहण्यासाठी उपयुक्त टिप्स!*
आपण आहाराशी निगडित लहान गोष्टींकडे फार लक्ष देत नाही. तसेच अशा बऱ्याच गोष्टी खातो जे आपल्या आरोग्याला फायदेशीर नसतात. चला, तर दिवसभर सक्रिय राहण्यासाठी खालील गोष्टी तुम्हाला मदत करतील...
*1.* दररोज भरपूर पाणी (तीन ते चार लिटर) प्या, आणि कॅलरी मुक्त गोष्टींचे सेवन करा.
*2.* सकाळी न्याहारी घ्या. न्याहारी न घेतल्यानं अनेक आजार होऊ शकतात.
*3.* रात्री स्नॅक्स घेताना जपूनच खा.
*4.* दिवसभर दोन जेवणाच्या मध्ये किमान चार तासांचे अंतर असू द्यावे. सारखे काही ना काही खाणे टाळा.
*5.* आहारात प्रथिने समाविष्ट करण्याचा प्रयत्न करा.
*6.* आहारात गरिष्ठ आणि मसालेदार पदार्थ नसावे.
*7.* खाण्यात लाल, हिरव्या, संत्री रंगाचे पदार्थ आवर्जून घ्या.
*8.* वजन कमी करण्यासाठी जेवणात मीठ कमी करा.
*9.* दररोज जेवणापूर्वी कमी कॅलरी असलेले व्हेजिटेबल सूप घ्यावे. यामुळे 20 टक्के कॅलरी कमी खर्च होईल.
*10.* कॅलरीची संख्या वगळून पोषक घटक असलेला आहार घ्यावा.
व
Comments
Post a Comment